ऐतिहासिक निर्णय / कोरोनामुळे लालबागचा राजा गणेशोत्सव रद्द; 11 दिवस आरोग्योत्सव, सीएम रिलीफ फंडमध्ये दान करणार रक्कम

King Ganeshotsav of Lalbaug canceled due to corona; 11 days health festival, amount to be donated to CM Relief Fund
X
King Ganeshotsav of Lalbaug canceled due to corona; 11 days health festival, amount to be donated to CM Relief Fund

  • यापूर्वी काही गणेश मंडळांनी मूर्तींची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला

Divyabhaskar.com

Jul 29, 2020, 02:51 PM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जगप्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेश मंडळाने यंदाचा गणेशोत्सवाचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील कोरोना परिस्थितीत राज्यातील स्थिती सर्वात वाइट आहे. अशात लालबागचा राजा मूर्तीची प्रतिष्ठापना करणार नाही तर केवळ ‘आरोग्योत्सव’ साजरा करणार आहे. यापूर्वीच अनेक गणेश मंडळांनी मूर्तीची उंची कमी करण्याचे निर्णय घेतले आहेत. परंतु, लालबागमध्ये यंदा मूर्तीच न बसवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. तरीही गणेशोत्वसाच्या 11 दिवसांमध्ये या ठिकाणी रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपी यासारखे उपक्रम राबविले जाणार आहेत.

सीएम रिलीफ फंडमध्ये दान करणार पैसे

लालबागचा राजा गणेश मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी गणेशोत्सवाची रक्कम दान करणार असल्याची घोषणा केली. त्यांनी सांगित्याप्रमाणे, "यावेळी गणेशोत्सव साजरे करणार नाही. तसेच गणेशोत्सवासाठी असलेले पैसे मुख्यमंत्री मदत निधीमध्ये दान केले जाणार आहेत. यासोबतच, आम्ही एलओसी (नियंत्रण रेषा- भारत पाकिस्तान सीमा) आणि एलएसी (प्रत्यक्ष नियंत्रण रेषा - भारत चीन सीमा) वर शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करणार आहो

Next Stories

    ની  સંપૂર્ણ વાંચનસામગ્રી